
७५व्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये पहिल्यांदाच एका लोककलावंताला सहभागी होण्याचा मान मिळाला आहे.

हा मान राजस्थानी गायर मामे खान याला मिळाला आहे.

मामे खान हा सर्वोत्कृष्ट गायक आहे.

बॉलिवूडमध्येही सध्या मामे खानची चर्चा आहे. अभिषेक बच्चन याच्या ‘दसवी’ चित्रपटासाठी ‘म्हारा मन होयो नखरालों…’ हे गाणं त्याने गायलं आहे.

हे गाणं देखील सगळीकडे चांगलंच व्हायरल झालं आहे.

कान्स चित्रपट महोत्सवासाठी निळ्या रंगाचं जॅकेट आणि गुलाबी कुर्ता तसेच डोक्यावर राजस्थानी फेटा असा त्याचा लूक होता.

कान्स चित्रपट महोत्सवामध्ये जाणारा हा पहिलाच लोककलावंत असल्याने त्याचं सगळ्या स्तरातून कौतुक होत आहे.

ऋतिक रोशनच्या ‘लक बाय चान्स’ चित्रपटासाठी देखील त्याने बाबो रे गाणं गायलं होतं.

राजस्थानमधील एका छोट्याश्या गावामधून आलेल्या या लोककलावंताने जगभरात नाव कमावलं आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)