
आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचा मानल्या जाणाऱ्या ७५व्या कान्स चित्रपट महोत्सवाला १७ मे पासून सुरुवात झाली आहे.
सध्या सगळीकडे कान्स चित्रपट महोत्सवाची जोरदार चर्चा सुरू आहे.
७५वा कान्स चित्रपट महोत्सव २८ मे पर्यंत असणार आहे.
या महोत्सवातील कलाकारांचे लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटियाने देखील कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली.
कान्स चित्रपट महोत्सवाच्या रेड कार्पेटवर तमन्ना पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये अवतरलेली दिसली.
ग्लॉसी मेकअप आणि कानातल्यांमुळे तमन्नाचा लूक अधिक खुलून दिसत होता.
तमन्नाने कान्स चित्रपट महोत्सवाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
रेड कार्पेटवर तमन्नाचा जलवा.
स्टनिंग लूकमधील तमन्नाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
तमन्नाच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
(सर्व फोटो : तमन्ना भाटिया, फेस्टिवल दि कान्स/ इन्स्टाग्राम)