
अभिनेत्री मानुषी छिल्लर ‘पृथ्वीराज’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
या चित्रपटामध्ये ती अभिनेता अक्षय कुमारबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच मानुषीच्या लूकची सगळीकडे चर्चा रंगली.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच मानुषी कोट्यावधी रुपयांची मालकीण आहे.
ती महिन्याला जवळपास २४ लाख रुपये कमावते.
शिवाय ‘पृथ्वीराज’ चित्रपटासाठी तिने अधिक मानधन घेतलं असल्याची देखील चर्चा आहे.
मानुषीला महागड्या गाड्यांची देखील आवड आहे.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच तिची असलेली कमाई पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
तिच्याकडे असलेल्या प्रत्येक कारची किंमत देखील कोटींच्या घरात आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)