
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयने छोट्या पडद्यावरून कलाविश्वात पदार्पण केलं.
‘नागिण’ मालिकेमुळे मौनीला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
या मालिकेत मौनीने साकारलेली नागिणीची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली.
मौनीने ‘गोल्ड’, ‘मेड इन चायना’ या बॉलिवूड चित्रपटांतही काम केलं आहे.
सध्या मौनी ‘डिआयडी लिटल मास्टर’ या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकच्या भूमिकेत आहे.
अभिनयासोबतच मौनीला नृत्याचीदेखील आवड आहे. मौनी उत्कृष्ट नृत्यांगणा आहे.
मौनीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकतंच मौनीने फोटोशूट केलं आहे.
याचे फोटो मौनीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
मौनीने फोटोमध्ये मेटालिक स्कर्ट आणि टॉप परिधान केला आहे.
सोनेरी रंगाच्या इंडियन फ्युजन ड्रेसमधील मौनीचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
मेटालिक ड्रेसमध्ये मौनीचा जलवा.
फोटोमधील मौनीच्या अदा चाहत्यांना घायाळ करत आहेत.
मौनीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
(सर्व फोटो : मौनी रॉय/ इन्स्टाग्राम)