
कंगना रणौत ‘धाकड’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीमबरोबर जगभरात फिरत आहे.

तिने आता काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन हर हर महादेव म्हणत शिवपूजा केली आहे.

यादरम्यानचे फोटो कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

या चित्रपटामधील तिचा सहकलाकार अर्जुन रामपालनेही ‘धाकड’च्या टीमबरोबर वाराणसीला भेट दिली.

पण ती देवदर्शन का करत आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तिचा हा खटाटोप चित्रपट सुपरहिट ठरवा म्हणून चालला आहे.

याआधी कंगनाने तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं होतं.

सध्या कंगना ‘धाकड’ चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे.

कंगनाच्या या चित्रपटाच्या ट्रेलरची देखील जोरदार चर्चा रंगली होती.

आता या चित्रपटाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)