
७५व्या कान्स चित्रपट महोत्सवाला १७ मे पासून सुरुवात झाली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हेली शाहने या महोत्सवाला हजेरी लावली आहे.

या महोत्सवासाठी हेलीने फिकट हिरव्या रंगाचा शिमरी गाऊन परिधान केला आहे.

हेलीने केलेली बन हेअरस्टाइल आणि डोळ्यांचा मेकअप सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे.

या महोत्सवातील अनेक फोटो हेलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या लूकमध्ये हेली खूपच सुंदर दिसत आहे.

हेलीच्या या लूकचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

२८ मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे.

२०१० साली हेलीने ‘गुलाल’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.

हेलीने अनेक गाजलेल्या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

‘खुशियों की गुल्लक आशी’ आणि ‘स्वरागिनी’ या मालिकेतून हेलीला खरी ओळख मिळाली.

(सर्व फोटो सौजन्य : हेली शाह / इन्स्टाग्राम)