
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

प्राजक्ताने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

प्राजक्ता ही ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून घराघरात पोहोचली.

प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.

सध्या प्राजक्ता ही ‘रानबाजार’ या वेबसीरिजमुळे चांगलीच चर्चेत आहे.

या वेबसीरिजच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या प्राजक्ता माळीने बोल्ड सीन दिले आहे. यावरुन त्यांना ट्रोलही केले जात आहे.

नुकतंच प्राजक्ताने एक हटके फोटोशूट केले आहे.

यात तिने काळ्या रंगाचा जंपसूट परिधान केला आहे.

या फोटोशूटला कॅप्शन देताना ती म्हणाली, “आणि तुम्ही मला सिंहापेक्षा ही जोरात डरकाळी देताना ऐकू शकाल. कारण मी त्यात सर्वोत्कृष्ट आहे आणि तुम्ही माझा आवाज नक्की ऐकणार आहात.”

सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसत आहे.