
महाराष्ट्राची लाडकी क्रश आणि मराठी कालविश्वातील लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हृता दुर्गुळे १८मे रोजी विवाहबंधनात अडकली.
दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत सप्तपदी घेत हृताने नवीन आयुष्याला सुरुवात केली.
अनेक मराठी कलाकारांनी हृता-प्रतीकच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.
हृता-प्रतीकच्या लग्नसोहळ्यातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स करत हृताला शुभेच्छा दिल्या आहेत.
विवाहसोहळ्यातील खास क्षण.
लग्नसोहळ्यातील रिसेप्शनचे फोटो हृताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
नवविवाहित जोडी हृता-प्रतीक.
हृताच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा वर्षाव होतो आहे.
साजिरी-गोजिरी जोडी आहे ही जबर.
डिसेंबर महिन्यात हृता आणि प्रतीकचा साखरपुडा पार पडला होता.
प्रतीक हा लोकप्रिय अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे.
प्रतीकने ‘बेहद २’, ‘एक दिवाना था’ आणि ‘तेरी मेरी एक जिंदगी’ यासारख्या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
हृताने आपल्या अभिनय कौशल्य आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.
मराठी कलाविश्वात अल्पावधीतच स्वतःची ओळख निर्माण करणारी हृता महाराष्ट्राची लाडकी क्रश बनली.
‘फुलपाखरू’ मालिकेतील हृताने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं.
सध्या ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत दिपूची भूमिका साकारून हृता प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
(सर्व फोटो : हृता दुर्गुळे/ इन्स्टाग्राम)