
अभिनेत्री हिना खान सध्या कान्स चित्रपट महोत्सवामुळे चर्चेत आहे.
तिचे या महोत्सवामधील रेड कार्पेटवरील लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
आता तिचा सोनेरी रंगाच्या गाऊनमधील लूक समोर आला आहे.
या नव्या लूकमध्ये हिना भलतीच सुंदर दिसत आहे.
या गाऊनवर तिने हाय हिल्स आणि कानातले घातले होते.
हिनाने या गाऊनवर खास फोटोशूट देखील केलं.
तिचा हा ग्लॅमरस लूक विशेष लक्षवेधी आहे.
हिनाने सोशल मीडियावर तिच्या हॉट लूकमधील फोटो शेअर करताच काही तासांमध्येच नेटकऱ्यांनी यासाठी पसंती दर्शवली.
गोल्डन ऑफ शोल्डर गाऊनमध्ये हिना बॉलिवूड अभिनेत्रींना देखील टक्कर देत आहे. (फोटो – इनस्टाग्राम)