
दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा, ऐश्वर्या राय, दिशा पटानी, रकुल प्रीत सिंग यांसारख्या अभिनेत्रींनी थेट बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि या अभिनेत्रींनी यातून काम करायला सुरुवात केली असे अनेकांना वाटते. (photo: indian express)

बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि येथूनच त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली असं तुम्हाला वाटत असेल तर तसे या अभिनेत्रीनं सोबत घडलेले नाही. इंडस्ट्रीत अशा अनेक बड्या अभिनेत्री आहेत ज्यांनी साऊथ चित्रपटातून पदार्पण केले, त्यानंतर त्यांना बॉलिवूडमध्ये संधी मिळाली. कोणत्या आहेत या अभिनेत्री ते जाणून घेऊयात. (photo: indian express)

बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पदुकोणलाही साऊथच्या चित्रपटात काम केल्यानंतर बॉलिवूडमध्ये संधी मिळाली. दीपिकाने २००६मध्ये ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून पदार्पण केले. (फोटो: deepika padukone/ instagram )

प्रियांका चोप्रानेही २००२ मध्ये तामिळ चित्रपट ‘थमिझन’मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये आली. (फोटो: priyankachopra / instagram )

१९९४ मध्ये मिस वर्ल्डचा ताज जिंकल्यानंतर ऐश्वर्या रायने १९९७ मध्ये ‘इरुवर’ या तमिळ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. (फोटो: aishwarya rai / instagram )

अनेकांचा असा विश्वास आहे की दिशा पटानीने २०१६ मध्ये आलेल्या ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, तर त्याआधी २०१५ मध्ये तिने साऊथ चित्रपट ‘लोफर’मध्ये काम केले होते. (फोटो: disha patani/ instagram )

क्रिती सेननने २०१४ मध्ये तेलुगू चित्रपट ‘१: Nenokkadine’ मधून पदार्पण केले. त्याच वर्षी ती टायगर श्रॉफसोबत हिरोपंती या चित्रपटात दिसली होती. (फोटो: kritisenan / instagram )

रकुल प्रीत सिंग पहिल्यांदा २००९ मध्ये कन्नड चित्रपट गिलीमध्ये दिसली होती. पाच वर्षांनंतर २०१४ मध्ये तिने ‘यारियां’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: Rakul Preet Singh/ instagram )

यामी गौतमने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अनेक टीव्ही शो आणि साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे. २०१२ मध्ये ‘विकी डोनर’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. (फोटो: Yami Gautam/ instagram)