
अभिनेत्री सारा अली खान सध्या तिचं व्हॅकेशन एण्जॉय करत आहे.
लंडनमध्ये ती सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
साराने यादरम्यानचे काही फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसत आहे. तसेच तिचा डॅशिंग लूकही पाहायला मिळत आहे.
सारा जीन्स, टी-शर्ट आणि जॅकेटमध्ये अगदी सुंदर दिसत आहे. तिच्या या नव्या लूकला नेटकऱ्यांनी देखील पसंती दिली आहे.
साराने लंडनमध्ये जेवणाचा आस्वाद घेत असल्याचा फोटो देखील शेअर केला आहे.
साराकडे सध्या बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची रांग लागली आहे.
विकी कौशलबरोबर ती एका हिंदी चित्रपटानिमित्ताने रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे.
तसेच विक्रांत मेस्सीची मुख्य भूमिका असणाऱ्या चित्रपटासाठी देखील साराच्या नावाची वर्णी लागली आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)