
अभिनेत्री माधुरी पवार सध्या प्लॅनेट मराठीच्या ‘रानबाजार’ वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.

या सीरिजमधील तिचा टक्कल असलेला लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण तिने खरं टक्कल केलं नाही तर माधुरीला यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली.

प्रोस्थेटिक मेकअपद्वारे तिचा हा टक्कल वेबसीरिजमध्ये दाखवण्यात आला.

प्रोस्थेटिक मेकअपसाठी तिला जवळपास सहा तास एकाच जागी बसावं लागायचं. तर हा मेकअप काढायला तीन तास लागायचे.

माधुरीला या भूमिकेसाठी खरं टक्कल करायचं होतं. पण हातात इतर प्रोजेक्ट असल्यामुळे तिला हा नवा प्रयोग करणं शक्य झालं नाही.

एक राजकीय भूमिका साकारताना माधुरीला बराच अभ्यास देखील करावा लागला.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण यासाठी तिला शिव्या देखील शिकाव्या लागल्या.

काही शिव्या तर लक्षात रहाव्यात म्हणून तिने अक्षरशः एका वहीमध्ये लिहून काढल्या.

या वेबसीरिजसाठी तिने घेतलेली मेहनत वेबसीरिज पाहिल्यावर दिसून येतेच. तसेच ‘रानबाजार’ प्रदर्शित झाल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)