
हिना खानपासून शहनाझ गिल आणि सनी लिओनीपर्यंत अनेक अभिनेत्रींचं नशीब बिग बॉस रिअलिटी शोमुळे चमकलं आहे. या शोमध्ये सहभागी होणं या अभिनेत्रींसाठी लकी ठरलं.

बिग बॉसमुळे या अभिनेत्रींना फक्त प्रसिद्धी आणि स्वतःची वेगळी ओळखच मिळाली नाही तर त्यांच्या करिअरमध्येही पुढे जाण्याची संधी मिळाली.

रश्मी देसाईसाठी बिग बॉसमध्ये सहभागी होणं करिअरच्या दृष्टीकोनातून फारच फायद्याचं ठरलं.

बिग बॉस १३ मध्ये सहभागी झाल्यानंतर एकता कपूरनं रश्मीला ‘नागिन ४’ साठी साइन केलं. याशिवाय ती अनेक अल्बम साँगमध्येही दिसली आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी सनी लिओनीला देखील बिग बॉसचं तिकीट मिळालं होतं.

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिला ‘जिस्म २’साठी विचारण्यात आलं होतं आणि मग तिनं या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

बिग बॉसमध्ये येण्याआधी शहनाझ गिलला फक्त पंजाबमध्येच अभिनेत्री आणि गायिका म्हणून ओळखलं जात होतं.

पण बिग बॉसनंतर मात्र तिचं नशीब पलटलं. लवकरच शहनाझ गिल सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा आहेत.

बिग बॉस १३ नंतर अभिनेत्री माहिरा शर्मा टीव्ही जगतातील प्रसिद्ध चेहरा ठरली आहे. या शोमधून बाहेर पडल्यानंतर माहिराकडे बरेच प्रोजेक्ट आहेत.

शोमधून बाहेर पडल्यानंतर माहिरानं बऱ्याच म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे. त्यानंतर आता तिने पंजाबी चित्रपटांवर आपलं लक्ष केंद्रित केलं आहे.

टीव्ही शो ‘नागिन’मध्ये दिसलेली जास्मिन भसीन बिग बॉस १४ मध्ये दिसली होती.

बिग बॉसनंतर जास्मिनला अनेक म्युझिक व्हिडीओसाठी विचारलं गेलं आणि तिच्याकडे सध्या बरेच प्रोजेक्ट आहेत.

अभिनेत्री दीपिका कक्कर बिग बॉसच्या १२ व्या पर्वाची विजेती ठरली होती.

बिग बॉस १२ जिंकल्यानंतर दीपिका कक्करकडे बऱ्याच शोच्या ऑफर आल्या होत्या.

हिना खानसाठी ११ नशीब पलटवणारं ठरलं. तिच्या करिअरमध्ये तिला चांगल्या संधी बिग बॉसनंतर मिळाल्या.

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर हिनानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिला कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्याची संधी देखील मिळाली.

अभिनेत्री रुबीना दिलैक बिग बॉस १४ ची विजेती ठरली होती. हे पर्व तिच्यासाठी खूपच फायद्याचं ठरलं.

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर तिने ‘शक्ती’ मालिकेत धमाकेदार एंट्री केली होती. त्याशिवाय ती काही म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. (फोटो- इन्स्टाग्राम)