
अभिनेत्री कंगना रणौतचा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘धाकड’ चित्रपट सुपरफ्लॉप ठरला.
चित्रपटाचं जोरदार प्रमोशन कंगनाने केलं मात्र प्रत्यक्षात त्याचा फायदा झाला नाही. बॉक्सऑफिसवर हा चित्रपट चांगलाच आपटला.
कंगनाच्या फिल्मी करिअरला आता १६ वर्ष पूर्ण झाली आहेत.
दिग्दर्शक अनुराग बासु यांच्या ‘गँगस्टर’ चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
तिचा हा पहिलाच चित्रपट बॉक्सऑफिसवर फारशी जादू करु शकला नाही.
त्यानंतर कंगनाने ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘राज’, ‘फॅशन’, ‘काइट्स’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन’ सारखे बरेच हिंदी चित्रपट केले.
आतापर्यंत एकूण ३६ चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
पण या ३६ चित्रपटांपैकी कंगनाचे फक्त ५ चित्रपटच सुपरहिट ठरले.
यामध्ये ‘क्रिश ३’, ‘तनु वेड्स मनु’, ‘क्रिश ३’, ‘वन्स अपॉन अ टाइम्स इन मुंबई’ चित्रपटांचा समावेश आहे.
कंगनाने बरेच चित्रपट केले असले तरी त्यामध्ये सुपरफ्लॉप चित्रपटांची यादी खूप मोठी आहे.
तिच्या संपूर्ण करिअरवर नजर टाकली तर खरंच कंगनाच्या करिअरला उतरती कळा लागली आहे का? असा प्रश्न उद्भवतो.
कंगना चांगले आणि उत्तम चित्रपट घेऊन बॉक्सऑफिसवर दाखल होईल अशी प्रेक्षकांना देखील अपेक्षा आहे. (फोटो – सगळे फोटो इन्स्टाग्राम)