
‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अमृता धोंगडेने अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे.
अमृताने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे.
हे फोटोशूट अमृताने दाक्षिणात्य पारंपरिक पोशाखात केले आहे.
या फोटोंमध्ये अमृताने सोनेरी रंगाची साडी परिधान केली आहे.
साडी, पारंपरिक दागिने, केसात माळलेला गजरा यांमध्ये अमृताचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.
या दाक्षिणात्य अंदाजात अमृता खूपच सुंदर दिसत आहे.
या फोटोशूटवर नेटकऱ्यांकडून लाइक्सचा वर्षाव होत आहे.
(सर्व फोटो सौजन्य – अमृता धोंगडे / इन्स्टाग्राम)