
लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून घराघरात पोहोचली.
या मालिकेत तिने शेवंता हे पात्र साकारले होते. तिच्या या पात्रामुळे अल्पावधीतच ती प्रसिद्ध झाली.
अभिनय आणि भूमिकेतील ठसकेबाजपणा यामुळे तिने चाहत्यांच्या मनात घर केलं.
अपूर्वा ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते.
ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
नुकतंच अपूर्वाने इन्स्टाग्रामवरील ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला.
यावेळी अपूर्वाला नेटकऱ्यांनी विविध प्रश्न विचारले. तिनेही चाहत्यांच्या या प्रश्नाला मनमोकळेपणाने उत्तर दिली.
यावेळी तिच्या एका चाहत्याने तिला रिलेशनशिपबद्दल प्रश्न विचारला.
‘तू सिंगल आहेस की तुझं लग्न झालंय?’ असा प्रश्न एका चाहत्याने विचारला होता.
त्यावर तिनेही हटके शब्दात उत्तर दिले आहे.
“मी सध्या तरी सिंगल आहे. त्यात मी खूश आहे. पण तरीही मी माझ्या प्रिय व्यक्तीची वाट बघतेय”, असे तिने या प्रश्नला उत्तर देताना म्हटले.
तिच्या या उत्तरावर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.