
अभिनेता अभिजित खांडकेकर (Abhijeet khandekekar) आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकर (Sukhda khandekar) यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यापैकी एक आहे.

नुकतेच त्या दोघांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत त्यांनी नवीन घर घेतल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अभिजित आणि सुखदाने मुंबईत नवीन घर घेतलं आहे.

त्याचे फोटो त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून शेअर केले आहेत.

या सेलिब्रेटी कपलने मोठ्या थाटामाटात आपल्या नव्या घराचा गृहप्रवेश सोहळा पार पाडला.

या दोघांनी पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने सर्व पूजाविधी पार पाडल्या.

अभिजित सध्या ‘तुझेच गीत गट आहे’ या मालिकेत काम करत आहे.

सुखदा ‘पुण्यश्लोक आहिल्याबाई’ या हिंदी मालिकेत काम करत आहे. (All Photo Credit : Abhijeet Khandkekar Instagram)