
अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या बहुचर्चित ‘भूल भुलैय्या २’ (Bhool Bhulaiyaa 2) चित्रपटाला मिळत असलेलं यश एण्जॉय करत आहे.

लवकरच कार्तिकचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटी रुपयांचा टप्पा पार करेल.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कार्तिक कोलकत्याला पोहोचला होता.

यावेळी त्याने चक्क टॅक्सीवर चढून चाहत्यांशी संवाद साधला.

हावडा ब्रीज येथे टॅक्सीवर कार्तिक आर्यन चढला आणि त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.

इतकंच नव्हे तर त्याने टॅक्सीवर चढून विविध पोझ देखील दिल्या.

कार्तिकने बॉलिवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं असलं तरी त्याच्यामधील साधेपणा हा कायम टिकून आहे.

कार्तिकने करोडो रुपयांच्या गाडीमधून प्रवास न करता रिक्षामधून प्रवास करत असल्याचंही मध्यंतरी समोर आलं होतं.

कार्तिकचा हा साधेपणा त्याच्या चाहत्यांना अधिक आवडतो.