
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ला प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट ‘केजीएफ ३’ चित्रपटाचेही रेकॉर्ड ब्रेक करणार असल्याचं बोललं जातं आहे. यामागे काही कारणं आहेत.
२०१८मध्ये आमिरचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर तो रुपेरी पडद्यावर दिसलाच नाही.
आता काही वर्षांनी तो पुन्हा एकदा चित्रपट करत आहे. त्यामुळे आमिरला पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करु शकतात.
तसेच आमिर आणि करीना कपूर खान या चित्रपटाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.
आमिरचा हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ चित्रपटाचा रिमेक आहे. त्यामुळे या चित्रपटाची कथा देखील तितकीच तगडी असणार आहे.
शिवाय १५ ऑगस्टच्या ऐन मोक्यावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाला याचा बराच फायदा मिळू शकतो.
शिवाय या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि सलमान खान देखील काम करताना दिसणार असल्याचं बोललं जात आहे.
एकूणच काय तर आमिरचा चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालणार असल्याचं बोललं जात आहे. (फोटो – फाईल फोटो)