
‘आई कुठे काय करते’ मालिकेमधील यश म्हणजेच अभिनेता अभिषेक देशमुख छोट्या पडद्यामुळे नावारुपाला आला.

अभिषेकबरोबरच त्याची बहिण अमृता देशमुख ही देखील कलाक्षेत्रात कार्यरत आहे.

अमृताने मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

झी युवा वाहिनीवरील ‘फ्रेशर्स’ या मालिकेमुळे ती नावारुपाला आली.

या मालिकेमध्ये तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.

त्याचबरोबरीने ‘स्वीटी सातारकर’ सारख्या चित्रपटामध्येही तिने काम केलं आहे.

अमृताचे सोशल मीडियावर देखील लाखोंच्या घरात फॉलोवर्स आहेत.

इतकंच नव्हे तर ती तिच्या अभिनयाव्यतिरिक्त वेगवेगळ्या लूकमुळे देखील चर्चेत असते.

अमृताच्या सुपरहॉट लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते. (फोटो – इन्स्टाग्राम)