
अभिनेते शरद पोंक्षे यांचं नाव चित्रपटसृष्टीमध्ये आदाराने घेतलं जातं.
सुपरहिट चित्रपट, मालिका, नाटक यामध्ये शरद पोंक्षे यांनी काम केलं आहे.
त्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
कर्करोगावर मात केल्यानंतर त्यांनी नव्या जोमाने पुन्हा कामाला सुरुवात केली.
शरद पोंक्षे यांना एक मुलगी आणि मुलगा आहे. त्यांचा मुलगा स्नेह देखील कलाक्षेत्रात कार्यरत आहे.
स्नेहने कलाक्षेत्रात आपल्या करिअरला सुरुवात केली आहे.
प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर’ चित्रपटासाठीही स्नेहने काम केलं आहे.
‘धर्मवीर’च्या दिग्दर्शकांच्या टीममध्ये स्नेहचा सहभाग होता.
त्याचबरोबरीने अभिनय क्षेत्रातही उत्तमोत्तम काम करण्याची स्नेहची इच्छा आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)