
बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडप्याच्या यादीमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं नाव टॉपला आहे.

आलिया-रणबीने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. १४ एप्रिलला या दोघांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला.

आता कपूर कुटुंबियांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे.

आलियानेच स्वतः इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो शेअर करत याची माहिती दिली.

कपूर तसेच भट्ट कुटुंबियातील प्रत्येक व्यक्ती आज हा आनंद साजरा करत आहे.

जवळपास पाच वर्ष रणबीर-आलिया एकत्र राहिले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आलियाने सध्या तिच्या कामामधून देखील ब्रेक घेतला आहे.

आलियाने गरोदर असल्याचं जाहिर करताच दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

तसेच कलाक्षेत्रातील दिग्गज मंडळींनी देखील आलिया-रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो – इन्स्टाग्राम)