
हिंदी ‘बिग बॉस’मुळे अभिनेत्री निक्की तांबोळी प्रकाश झोतात आली.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी निक्की कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
निक्कीने लाखो रुपयांची महागडी कार खरेदी केली आहे.
निक्कीने मर्सिडीज Benz GLE कार खरेदी केली आहे.
तिने कारबरोबरचे फोटो देखील इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
या कारची किंमत जवळपास ८६ लाख रुपयांच्या घरात आहे.
निक्कीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचे वडील देखील दिसत आहेत.
निक्कीने फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी तिचं नवीन कार खरेदी केल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. (फोटो – इन्स्टाग्राम)