
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने सोनालीने खास फोटोशूट केले आहे.

सोनालीने फोटोशूट मधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये सोनाली गरबा डान्स करताना दिसत आहे.

सोनालीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने लेहेंगा परिधान केली आहे.

सोनालीच्या या नव्या लूकवर नेटकरी फिदा झाले आहे.

संजय जाधव दिग्दर्शित ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपट येत्या १५ जुलैपासून प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटात सुमारे तीस गाणी आहेत.

मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.

या चित्रपटाची निर्मिती अक्षय बर्दापूरकर यांनी केली आहे.

‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.

काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या गाण्यांनाही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहेत.

संजय जाधव यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची असून संवाद अरविंद जगताप यांचे आहेत.

(सर्व छायाचित्र सौजन्य – सोनाली कुलकर्णी / इन्स्टाग्राम)