
रंग, रुप किंवा देहरचनेवर तुमचं सौंदर्य किती चांगलं आहे हे ठरत नाही हे अभिनेत्री वनिता खरातकडे पाहिलं की लक्षात येतं.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे वनिता प्रकाश झोतात आली.

तिने फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

वनिता तिच्या भूमिकांमुळे चर्चेत असतेच. पण त्याचबरोबरीने तिच्या बोल्ड लूकमुळेही ती सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेते.

तिने आजवर बोल्ड लूकमध्ये बरंच फोटोशूट केलं आहे.

पण हे पाऊल उचलताना तिने आपल्या शरीररचनेचा विचार केला नाही. वनिताने अगदी बिनधास्त फोटोशूट करत स्टायलिस्ट पोझ दिल्या.

तिने काही वर्षांपूर्वी न्यू़ड फोटोशूट करण्याचा मोठ्या हिमतीने निर्णय घेतला.

वनिताचे हे फोटोशूट पाहून अनेकांनी तिचं कौतुक देखील केलं होतं.

‘कबीर सिंग’ या चित्रपटात वनिताने मोलकरणीची छोटीशी भूमिका साकारली. पण तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणारी होती. (फोटो – इन्स्टाग्राम)