
बॉलिवूड सेलिब्रिटी हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. सेलिब्रिटींची लाइफस्टाइल, त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.
सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफची.
एका मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोंमधील मॉडेल हुबेहूब कतरिनासारखी दिसत असल्यामुळे चाहतेही पेचात पडले आहेत.
या मॉडेलचे नाव अलिना राय असे आहे.
अलिनाचे डोळे, चेहऱ्याची ठेवण यामुळे पहिल्यांदा फोटो पाहिल्यावर ती कतरिनाच असल्याचे भासते.
टिकटॉक या सोशल मिडिया प्लॅटफॉर्ममुळे अलिना पहिल्यांदा चर्चेत आली होती.
कतरिनासारखी दिसत असल्यामुळे तिचे रिल्स प्रचंड व्हायरल झाले होते.
भारतात टिकटॉकवर बंदी आल्यानंतर अलिनाने इन्स्टाग्रामवर रिल्स बनवायला सुरुवात केली.
अलिना सोशल मीडियीवर प्रचंड सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर ७२ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत.
ग्लॅमरस फोटो अलिना इन्स्टाग्रामवरून शेअर करत असते.
एका कार्यक्रमादरम्यानचे तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे.
मॉडेलसोबतच अलिना अभिनेत्रीदेखील आहे.
रिल्सच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अलिनाने बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे.
‘लखनऊ जंक्शन’ या चित्रपटातून अलिनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २८ जानेवारी २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला.
याशिवाय तिने शॉर्ट फिल्ममध्येही काम केले आहे.
यापूर्वीही हुबेहूब बॉलिवूड सेलिब्रिटींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
(सर्व फोटो : अलिना राय, कतरिना कैफ / इन्स्टाग्राम)