
चित्रपटसृष्टीत काही कलाकार जोड्यांना प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळते. याच लोकप्रियतेमुळे या जोड्या वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अशीच एक जोडी म्हणजे माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांची.
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
या जोडीने आतापर्यंत अनेक चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
‘तेजाब’, ‘राम लखन’, ‘जमाई राजा’, ते ‘पुकार’ अशा अनेक चित्रपटात त्या दोघांनी स्क्रीन शेअर केली.
अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची ऑनस्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.
अनेकदा ते दोघे लग्न करणार असल्याच्या अफवाही उठल्या होत्या. मात्र माधुरीने त्यावर स्पष्ट शब्दात नकार दिला होता.
जवळपास ३३ वर्षांपूर्वी म्हणजेच १९८९ मध्ये जेव्हा माधुरीला अनिल कपूरसोबत लग्न करणार का? अशी विचारणा करण्यात आली होती. त्यावर तिने नकार दिला होता.
“मला अनिलसारख्या माणसाशी लग्न करायला अजिबात आवडणार नाही”, असे तिने सांगितले होते.
“कारण तो फारच संवेदनशील आहे आणि माझा होणारा नवरा हा इतका शांत असावा, असे मला वाटत नाही”, असेही ती म्हणाली.
“अनिल बद्दल बोलायचं तर मी त्याच्यासोबत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना माझ्या वागण्यात सहजता असते”, असे तिने म्हटले.
“विशेष म्हणजे आम्ही आमच्या कथित अफेअरबद्दल विनोदही करु शकतो”, असेही ती म्हणाली.
माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शक प्रयाग राज यांच्या हिफाजत या चित्रपटात एकत्र काम केले होते.
आतापर्यंत अनिल आणि माधुरी यांनी एकत्र १६ सिनेमांमध्ये काम केले आहे.
‘घरवाली बाहरवाली’, ‘राजकुमार’, ‘दिल तेरा आशिक’, ‘धारावी’, ‘खेल’, ‘बेटा’,’प्रतिकार’,’जमाई राजा’,’किशन कन्हैया’, ‘परिंदा’,’राम लखन’, ‘तेजाब’ आणि ‘हिफाजत’ या हिट सिनेमांमध्ये काम केले आहे.
त्यानंतर पुन्हा एकदा अनिल- माधुरीची हिट जोडी १८ वर्षांनंतर टोटल धमाल या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एकत्र झळकली.
अनिल कपूर यांनी १९८४ मध्ये सुनितासोबत लग्न केले. त्यांना सोनम कपूर, रिया कपूर आणि हर्षवर्धन कपूर अशी तीन मुलं आहेत.
तर माधुरी दीक्षितने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेनेसोबत गुपचूप लग्न केले होते. लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. २०११ मध्ये ती पुन्हा भारतात परतली.
सर्व फोटो – अनिल कपूर माधुरी दीक्षित