
भारतीय चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक लिना मणीमेकल यांच्या ‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

पोस्टरमधून कालीमातेचा अपमान झाल्याचा दावा अनेकांनी केला आहे.

चित्रपट निर्मात्या आणि दिग्दर्शक लिना मणीमेकल यांच्या अटकेची मागणीही होताना दिसत आहे.

परंतु, चित्रपटाच्या पोस्टरमुळे वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक चित्रपटांचे पोस्टार वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

डर्टी पॉलिटिक्स : राजकारणावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमुळेही वाद निर्माण झाला होता. पोस्टरमध्ये अभिनेत्री मलिका शेरावतने गुंडाळलेलं कापड हे राष्ट्रध्वजाच्या तिरंग्यासारखे असल्यामुळे या पोस्टरवरून वादंग निर्माण झाला होता.

नंतर चित्रपटाचे पोस्टर बदलण्यात आले होते.

पीके : २०१४ साली प्रदर्शित झालेला बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘पीके’ हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.

या चित्रपटाच्या पोस्टरमुळेही वाद निर्माण झाला होता.

ओह माय गॉड : देवतांना दोषी ठरवल्याचं दिसत असल्यामुळे चित्रपटाच्या पोस्टरवर नेटकऱ्यांकडून टीका करण्यात आली होती.

या चित्रपटाच्या सिक्वेलच्या पोस्टरमध्ये अभिनेता अक्षय कुमारला महादेवाच्या अवतारात दाखवल्याने नेटकरी संतापले होते.

रंग रसिया : २०१४ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

पोस्टरवर नग्नवस्थेत कलाकार दाखवल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

जिस्म २ : २०१२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून अभिनेत्री सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

या चित्रपटाच्या पोस्टरमुळे अनेक वाद निर्माण झाले होते.

(सर्व फोटो : आयएमडीबी, इंडियन एक्सप्रेस )