
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’च्या पहिल्या सिझनमधून अभिनेत्री सई लोकूर घराघरात प्रसिद्ध झाली.

सई लोकूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

नुकतेच सईने फोटोशूट केले असून त्याचे फोटो शेअर केले आहेत.

सई इन्स्टाग्रामवर चांगलीच सक्रीय असते.

नऊवारी साडीतील पारंपरिक वेशातील सईचा खास लूक…

हिरव्या रंगाची नऊवारी साडी, केसांचा अंबाडा, ठसठशीत पारंपरिक दागिने असा पेहराव सईने केला आहे.

या फोटोंमध्ये सईचा मराठमोळा लूक दिसून येत आहे.

सईचे हे फोटो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

नऊवारी साडीमध्ये सईचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.

या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्सचा पाऊस पडत आहे.

(सर्व फोटो सौजन्य : सई लोकूर / इन्स्टाग्राम)