-
बॉलिवूडमधील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते अनुपम खेर यांनी आजवर अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
-
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘दिल’, ‘द काश्मीर फाईल्स’, ‘स्पेशल २६’, ‘हम आपके है कोन’ या सुपरहिट चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या.
-
दमदार अभिनयाने अनुपम खेर यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
-
त्यांच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे ‘कुछ कुछ होता है’.
-
या चित्रपटात त्यांनी राणी मुखर्जीचे वडील आणि प्राध्यापक मल्होत्रा ही भूमिका साकारली होती.
-
या चित्रपटातील मीम्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
हे मीम्स पाहून अनुपम खेर यांनाही हसू अनावर झाले. नुकतीच त्यांनी याबद्दल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर केली आहे.
-
अनुपम खेर यांनी चित्रपटातील एका सीनचा फोटो पोस्ट केला आहे. मिस्टर म्हलोत्रा आणि मिस ब्रिगान्झा यांच्यामधील फोनवरील संवादाचा हा सीन आहे.
-
या फोटोमध्ये अनुपम खेर बेडवर झोपून मिस ब्रिगान्झा यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत.
-
“मिस्टर म्हलोत्रा आणि मिस ब्रिगान्झा यांच्यामधील फोनवरील संवादाचा हा सीन अगदी नेहमीच्या सीनप्रमाणे शूट होणार होता. पण सीन शूट करताना मी विविध पोझ देत शेवटी बेड वरून खाली पडलो आणि सेटवर एकच हशा पिकला. यामुळे सीनमध्ये रंजकता आली. या सीनवर इतके मीम्स बनतील हा विचारही मी केला नव्हता”, असं कॅप्शन त्यांनी पोस्टला दिलं आहे.
-
कॅप्शमध्ये अनुपम खेर यांनी हसण्याचे इमोजीही पोस्ट केले आहेत.
-
त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
अनुपम खेर ‘कागज’ या त्यांच्या आगामी चित्रपटामुळेही चर्चेत आहेत.
-
‘इमर्जन्सी’ या कंगना रणौतच्या चित्रपटातही ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (सर्व फोटो : अनुपम खेर/ इन्स्टाग्राम)

पोलीस महिलेला बघून तरुणाने मर्यादा ओलांडली; मान धरली, किस केलं आणि… तिने पुढे जे केलं, पाहून व्हाल थक्क