-
देशाचा ७६वा स्वातंत्र्यदिन सगळीकडे मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.
-
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त राबविण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत अनेक कलाकारही सहभागी झाले.
-
परदेशातूनही अनेक सेलिब्रिटींनी स्वातंत्र्यदिनाच्या खास पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
-
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी तिरंग्यासोबतचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या.
-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने मन्नतच्या गच्चीवर तिरंगा फडकवत ७६वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
-
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अमेरिकेत स्वातंत्र्यदिन साजरा केला.
-
यावेळी तिने तिरंग्याचे रंग असलेली साडी नेसली होती.
-
अभिनेत्री हेमांगी कवीने स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेली पोस्ट चर्चेत आहे. अमेरिकेत हेमांगीने ७६वा स्वातंत्र्यदिवस साजरा केला. ‘माझ्या मागे अमेरिकन झेंडा दिसत असला तरी माझी नजर आपल्या भारताच्या तिरंग्या वरच आहे’, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.
-
मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारेने मुलगी जिवासह फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या.
-
लोकप्रिय अभिनेत्री अश्विनी महांगडेने दाक्षिणात्य पेहराव करून फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. ‘हजारो लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली म्हणून आज आपल्या चेहऱ्यावर हसू आहे’, असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार यशने कुटुंबियांसह स्वातंत्र्यदिन साजरा केला.
-
भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरने तिरंग्याचा फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या.
-
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अटलांटामध्ये ७६वा स्वातंत्र्यदिन साजरा केला.
-
याचे फोटो तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”