-
संपूर्ण देशभरात भारताच्या स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे.
-
भारताच्या कानाकोपऱ्यातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यात हा तिरंगा अभिमानाने फडकत असल्याचे पाहिले मिळतं आहे.
-
सर्वसामान्यपासून ते सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येकजण आज देशाचा ७५वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णींने अमेरिकेत स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.
-
यावेळी तिने तिरंगी रंगाची साडी परिधान केली होती.
-
याचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.
-
याद्वारे तिने भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
सोनाली बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने अमेरिकेला गेली आहे.
-
“अमेरिकेत लैहराया परचम… ??, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने साधारण ५००० मराठी माणसां सोबत, विदेशात आपली संस्कृती, कला, भाषा, विचारांची देवाण घेवाण करताना, हे सगळं साजरा करताना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरा केला असंच वाटतंय. या विलक्षण अनुभवाबद्दल अभिमान वाटतोय”, असे सोनालीने कॅप्शन देताना म्हटले आहे.
-
त्यासोबत तिने सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत.

IND vs ENG : रोहित शर्मा मालिका विजयानंतर विसरला ट्रॉफी? विराट-राहुल हसतानाचा मजेशीर VIDEO व्हायरल