-
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
-
करोनानंतर दोन वर्षांनी अगदी वाजत गाजत ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले.
-
मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्यांचा मान राखत वर्षा बंगल्यावर हजेरी लावली.
-
या भेटीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
यात अभिनेत्री श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, शिवानी सुर्वे, प्राजक्ता माळी, नम्रता संभेराव, मंगेश देसाई या कलाकारांचा समावेश आहे.
-
“महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेबांच्या वर्षा बंगल्यावर गणेशोत्सवासाठी निमंत्रणाचा फोन आला आणि भारावून गेलो आम्ही आणि त्यांच्याकडून हि बाप्पाची सुंदर मूर्ती भेट म्हणून मिळाली त्याबद्दल मनःपूर्वक आभारी. धन्यवाद दादा. भारी फिलिंग…, गणपती बाप्पा मोरया”, असे नम्रता संभेरावने पोस्ट करताना म्हटले आहे.
-
“काल माननीय मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य – एकनाथ शिंदे साहेब यांच्या अधिकृत निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले. आम्हाला इतक्या आदराने आणि प्रेमाने आमंत्रण देऊन उत्तम पाहुणचार केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि संपूर्ण शिंदे कुटूंबियांचे मनापासून आभार. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे…. Ps : आणि खूप दिवसांनी जग्गू दादाची भेट झाली त्याचा वेगळा आनंद”, असे श्रेया बुगडेने म्हटलं आहे.
-
वर्षा बंगल्यावर मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या घरी गणपती दर्शनाचा आणि सहभोजनाचा आम्ही सहकुटुंब लाभ घेतला,त्यांना उदंड आणि निरोगी आरोग्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना. बोला गणपती बाप्पा मोरया, असे अभिनेते मंगेश देसाईंनी कॅप्शन दिले आहे.
-
या फोटोत अभिनेते जकी श्रॉफ देखील दिसत आहे.
-
या सर्व कलाकारांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
-
सर्व फोटो – इन्स्टाग्राम



