-
दाक्षिणात्य अभिनेत्यांची लोकप्रियता सध्या वाढत आहे. या सुपरस्टार्सचे खासगी आयुष्यही खूप चर्चेत आहे. ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुन, ‘आरआरआर’ फेम रामचरण, ‘केजीएफ’ फेम यश यांच्यासह बऱ्याचशा दाक्षिणात्य अभिनेत्यांना पहिल्याच प्रेमात आयुष्यभरासाठी जोडीदार मिळाले आहेत.
-
‘वामसी’ या चित्रपटाच्या सेटवर महेश बाबू आणि त्याची पत्नी नम्रता शिरोडकर यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर काही दिवसांनी ते एकमेकांना डेट करु लागले. ती महेश बाबूचे पहिलं प्रेम होती. त्यांना दोन मुलं आहेत.
-
अल्लू अर्जुन आणि त्यांची पत्नी स्नेहा रेड्डी यांची ओळख अमेरिकेमध्ये एका लग्नात झाली होती. तेव्हा तो स्नेहाच्या प्रेमात पडला. ती अल्लू अर्जुनचे पहिलं प्रेम आहे. काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
सुपरस्टार थलापती विजयने त्याच्या चाहतीशी लग्न केले आहे. त्याची पत्नी संगीता ही त्याच्या चित्रपटाची मोठी चाहती होती. विजयला भेटण्यासाठी ती लंडनहून चेन्नईला आली होती. पहिल्या भेटीमध्येच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या लग्नाला २२ वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
रामचरणने ९ वर्षापूर्वी बालमैत्रिण उपासना कामिनेनीशी लग्न केले आहे. ऐन तारुण्यात रामचरण तिच्या प्रेमात पडला होता.
-
ज्युनिअर एनटीआरने त्याची बालमैत्रिण लक्ष्मी प्रणतिशी लग्न केले आहे. लग्नाच्या वेळी लक्ष्मी १९ वर्षाची होती. त्यांच्यामध्ये ९ वर्षाचे अंतर आहे.
-
यशने त्याची कारकीर्दीची सुरुवात मालिकांमध्ये काम करुन केली. या मालिकेमध्ये त्याची पत्नी राधिका पंडितदेखील होती. यादरम्यान त्यांचे अफेअर सुरु झाले. काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केले.
-
सुपरस्टार रजनीकांत एका मुलाखतीदरम्यान त्यांच्या पत्नीला लता यांना भेटले. लता कॉलेजतर्फे त्यांची मुलाखत घेण्यासाठी आल्या होत्या. मुलाखत संपल्यावर लगेच रजनीकांत यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली. त्यांच्या लग्नाला ४० वर्ष पूर्ण झाली आहेत.
-
‘पूवेल्लम केत्तुप्पर’ या तमिळ चित्रपटामध्ये सूर्या आणि त्याची पत्नी ज्योतिकाने एकत्र काम केले होते. ते अनेक चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत. चित्रीकरणादरम्यान त्यांच्यामध्ये जवळीक वाढत गेली. २००६ मध्ये त्यांनी लग्न केले. (All Photos: Social Media)

‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच