-
बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौतचे चाहते तिच्या पुढील चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता कंगनाच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या आसाम शेड्यूलचे शूटिंग पूर्ण झाले आहे. खुद्द कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शनही कंगना रणौत करत आहे. हा चित्रपट तिचे प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका या बॅनरखाली बनत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता.
-
कंगना रणौतचा चित्रपट १९७५-७७ च्या आणीबाणीच्या काळात भारतातील राजकीय गोंधळाचे चित्रण करणारा आहे. देशाच्या विविध भागात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.
-
चित्रपटाच्या सेटवरील काही छायाचित्रे शेअर करत कंगना म्हणाली की चित्रपटाचे आसाम शेड्यूल पूर्ण झाले आहे. कंगनाने शेअर केलेले फोटो पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
-
नुकतंच चित्रपटाच्या आसाम शेड्यूलचे शूटिंग पूर्ण झाले आहे. शेड्यूल पूर्ण झाल्यावर कंगनाने सेटवरील काही BTS फोटो शेअर केले.
-
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आणि लिहिले, ‘इमर्जन्सीच्या आसाम शेड्युलमधील काही बीटीएस स्टिल्स’.
-
शेअर केलेल्या फोटोमध्ये कंगना आसाममधील वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहे. कंगना कधी जंगलात तर कधी सेटवर आपली टीम आणि क्रू मेंबर्सबरोबर दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये ती चित्रपटाच्या काही सीन्सचे दिग्दर्शन करतानाही दिसत आहे. कंगनाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहते कमेंट करत आहेत.
-
लोकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता दिसून येत आहे. एका चाहत्याने लिहिले, ‘मी या चित्रपटाची प्रतीक्षा करू शकत नाही.’ तर एकाने हा चित्रपट आगामी ब्लॉकबस्टर असल्याचे लिहिले आहे.
-
या चित्रपटात कंगना इंदिरा गांधींची भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगना याआधी धाकड चित्रपटात दिसली होती. लवकरच ती तेजस या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
-
‘तेजस’मध्ये कंगना पायलटच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले असून पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला हा चित्रपट रिलीज होईल.
-
सर्व फोटो : कंगना रानौत/इन्स्टाग्राम

आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पुन्हा डिवचलं, दिलं आणखी एक खुलं आव्हान; म्हणाले, “मी तुमच्यासमोर…”