-
गेल्या काही काळापासून अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
-
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्येही त्यांच्या नात्याबाबत अनेक तथ्य मांडण्यात आले होते.
-
सध्या क्रिती आणि वरुण त्यांचा आगामी चित्रपट ‘भेडिया’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. यासाठी ते वेगवेगळ्या ठिकानणी आणि कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत आहेत.
-
नुकतंच अभिनेता वरुण धवन याने ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमात क्रिती आणि प्रभासच्या नात्याबाबत मोठा खुलासा केला होता.
-
मात्र दाक्षिणात्य आणि बॉलिवूड कलाकारांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक कलाकार रिलेशनमध्ये आले आहेत.
-
अभिनेता महेश बाबू आणि अभिनेत्री नम्रता शिरोळकर यांनीही लग्न केलं असून त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे.
-
मात्र, प्रभास व्यतिरिक्त इतरही अनेक दाक्षिणात्य कलाकारांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहेत. आज आपण या कलाकारांच्या नातेसंबंधांबद्दल जाणून घेऊया.
-
समंथा प्रभूशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता नागा चैतन्य याचे नाव अभिनेत्री शोभिता धूलिपालाबरोबर जोडले जात आहे.
-
या दोघांना अनेकवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. तथापि, या दोघांनीही आपल्या नात्याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.
-
सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनीही आपले नाते स्वीकारले नसले तरीही सोशल मीडियावर त्यांचे फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या खास नात्याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो.
-
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा या दोघांच्या नातेसंबंधांबाबत अनेक तर्क-वितर्क मांडले जात आहेत. मध्यंतरी त्यांच्या लग्नाचा मॉर्फ फोटोही व्हायरल झाला होता.
-
हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकू शकतात अशाही चर्चा आहेत.
-
दाक्षिणात्य सिनेमात छाप पाडल्यानंतर बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवणारी उत्कृष्ट अभिनेत्री रकुल प्रीत सिंग अभिनेता जॅकी भगनानीला डेट करत आहे.
-
दोघांनीही आपले हे नाते सर्वांपसून लपवून ठेवले नसले तरीही त्यांनी आपल्या नात्याबद्दल उघडपणे व्यक्तव्यही केलेले नाही.
-
कमल हसन यांची मुलगी आणि सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री श्रुती हसन शांतानू हजारिका याच्यासह रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांनीही आपले नाते उघड केले आहे. (सर्व फोटो : Instagram)

सत्यजीत तांबे प्रकरणावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जे राजकारण झालं…”