-
अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियाद्वारे त्यांच्या आजरपणाबद्दल जाहीरपणे सांगताना दिसतात. सामान्य माणसांप्रमाणे सेलिब्रेटीदेखील एखाद्या आजाराला बळी पडू शकतात, यावर त्यांच्या चाहत्यांचा विश्वास बसत नाही. कारण त्यांच्या मते सेलिब्रिटींचे आयुष्य ‘परफेक्ट’ असते. पण सत्य परिस्थिती मात्र अशी नसते.
-
सेलिब्रिटींना देखील गंभीर आजार होतात, अलीकडे याबाबत सर्वजण खुलेपणाने बोलू लागले आहेत. त्यांचे अनुभव, वेदना सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत आहेत.
-
छोट्या पडद्यावरील काही लोकप्रिय अभिनेत्रींना देखील काही गंभीर आजरांनी ग्रासले होते, याबाबत त्यांनी स्वतःच सर्वांना माहिती दिली होती. कोणत्या आहेत त्या अभिनेत्री जाणून घ्या
-
निम्रत अहलूवालिया सध्या ‘बिग बॉस’मुळे चर्चेत आहे. निम्रतने सोशल मीडियाद्वारे ती डिप्रेशनचा सामना करत असल्याचे सांगितले होते, याच कारणामुळे तिने कामातूनही ब्रेक घेतला होता.
-
देबिना बॅनर्जीने ब्लॉग्सच्या माध्यमातून गरोदरपणात तीला सामना कराव्या लागलेल्या सर्व अडचणींबाबत माहिती दिली.
-
‘बिग बॉस १४’ची विजेती रुबीना दिलैक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. एका मुलाखती दरम्यान तिने डिप्रेशनचा सामना करत असल्याचे सांगितले.
-
‘द कपिल शर्मा शो’मुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती २०११ पासून एंडोमेट्रियोसिस या आजारामुळे त्रस्त आहे.
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जॅस्मिन भसिनदेखील डिप्रेशन या आजाराला बळी पडली होती.
-
शमा सिकंदर ही अभिनेत्री परदेशात बायपोलर डिसऑर्डर या आजारावर उपचार घेत होती, यासाठी वर्षभरापेक्षा अधिक काळासाठी ती भारताबाहेर होती.
-
छोट्या पडद्यावरील ‘अनुपमा’ हे लोकप्रिय पात्र साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुलीने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली.
-
रुपालीला थायरॉईडचा त्रास आहे. यामुळेच गरोदरपणातही खूप त्रास सहन करावा लागल्याचे तीने सांगितले. गरोदरपणानंतर वजन वाढल्याने तीने कामातून ब्रेक घेतला होता. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्षांना कसं सांगणार? दादरमध्ये कबूतर खान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा