-
Hardeek Joshi-Akshaya Deodhar Wedding: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी अभिनेता हार्दिक जोशी व अभिनेत्री अक्षया देवधर आज विवाहबंधनात अडकले आहेत.
-
पुण्यात हार्दिक व अक्षयाचा शाही विवाहसोहळा पार पडला.
-
अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती हार्दिक-अक्षयाने लग्नगाठ बांधली.
-
अक्षयाने हातमागावर विणलेली लाल रंगाची पैठणी नऊवारी साडी नेसली आहे.
-
नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये अक्षयाचं सौंदर्य खुलून दिसतंय.
-
हार्दिकने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.
-
गेल्या कित्येक दिवसांपासून हार्दिक व अक्षयाने लग्नापूर्वीच्या प्रत्येक कार्याचे, विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
या लग्नसोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी हजेरी लावली आहे.
-
हार्दिक व अक्षयाच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
अत्यंत साधा मेकअप करुनदेखील अक्षयाचा लूक अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
-
या नवविवाहित जोडीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
गेल्या कित्येक दिवसांपासून हार्दिक व अक्षयाच्या लग्नाची चर्चा सुरू होती.
-
३ मे रोजी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर हार्दिक-अक्षयाचा साखरपुडा पार पडला होता.
-
हार्दिक व अक्षया बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते.
-
झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून हार्दिक व अक्षया महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले.
-
लवकरच हार्दिक व अक्षया ‘फाईल नंबर – ४९८ अ’ या चित्रपटात दिसणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : हार्दिक जोशी, अक्षया देवधर / इन्स्टाग्राम)

निवडणूक जिंकली, आता पुढे काय? सत्यजीत तांबेंनी केले सूतोवाच; म्हणाले, “येत्या ४ तारखेला…!”