-
वय म्हणजे केवळ एक आकडा हे अभिनेते बोमन इराणी यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. ज्या वयात लोक त्यांच्या निवृत्तीचा आणि सेकंड इनिंगचा विचार करतात त्या वयात बोमन यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि सिनेसृष्टित स्वतःचा ब्रॅंड तयार केला.
-
पण यासाठी बोमन यांनी अत्यंत जीव तोडून मेहनत घेतली आहे. आज बोमन हे ६३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊयात.
-
बोमन यांनी नुकतंच अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांच्याबरोबर ‘उंचाई’ या चित्रपटात काम केलं.
-
मुंबईच्या नागपाडा परिसरात इराणी कुटुंबात जन्मलेल्या बोमन यांना लहानपणीपासूनच अभिनयाची आवड होती, पण याबरोबरच लहानपणी त्यांना डीसलेक्सियासारख्या समस्येचा सामना करावा लागत होता.
-
तरुणपणात बोमन यांनी ताज महाल पॅलेस या मुंबईच्या आलीशान हॉटेलमध्ये वेटर तसेच रूम सर्व्हिस म्हणूनही काम केलं होतं.
-
वडील लवकरच गेल्यामुळे बोमन यांनी त्यांच्यावर पडेल ते काम केलं. वयाच्या ३२ व्या वर्षांपर्यंत बोमन यांनी आईच्या बेकरीमध्ये आणि नमकीनच्या दुकानात काम करत घराला हातभार लावला.
-
तेव्हा बोमन दुकानात वेफर्स आणि चहा विकायचे. याबरोबरच बोमन यांना फोटोग्राफीची खूप आवड होती.
-
ताजमध्ये काम करत असताना पहिल्या मिळालेल्या टीपमधून त्यांनी त्यांचा पहिला कॅमेरा विकत घेतला होता.
-
१९८१ ते १९८३ मध्ये बोमन यांनी नाटकाचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. ते करत असताना बोमन यांची ओळख श्यामक दावरशी झाली आणि मग तिथून हळूहळू त्यांना काम मिळायला सुरुवात झाली.
-
पहिले फँटा. क्रॅकजॅक आशा जाहिरातींमधून बोमन यांनी काम केलं.
-
नंतर ‘डरना मना है’ या चित्रपटातून त्यांनी या क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट चांगलाच गाजला.
-
यापाठोपाठ २००३ साली ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटाने बोमन यांना खरी ओळख मिळवून दिली आणि मग नंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. मग ‘३ इडियट’, ‘डॉन’, ‘हाऊसफूल’, ‘लक्ष्य’ ते ‘उंचाई’ असा हा बोमन यांचा प्रवास अजूनही अव्याहत सुरूच आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)
वेटर, फोटोग्राफर ते बॉलिवूड स्टार; ४२ व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या बोमन इराणी यांचा थक्क करणारा प्रवास
बोमन यांनी नुकतंच अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांच्याबरोबर ‘उंचाई’ या चित्रपटात काम केलं
Web Title: Boman irani and his journey of becoming bollywood actor at the age of 42 avn