-
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
-
१८ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील ट्वीस्ट, क्लायमेक्स व कलाकरांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना धरुन ठेवलं. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करताना दिसत आहेत.
-
‘दृश्यम २’ ने अवघ्या दहा दिवसांतच बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा गल्ला जमवला. वर्ल्ड वाइड ‘दृश्यम २’ ने रविवारपर्यंत (२७ नोव्हेंबर) २०७ कोटींचा टप्पा गाठला.
-
‘दृश्यम २’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५.३८ कोटींची कमाई केली होती. ‘ब्रह्मास्र’ नंतर ‘दृश्यम २’ पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
-
२०१५ साली प्रदर्शित झालेल्या दृश्यम या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. ट्रेलरपासूनच ‘दृश्यम २’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. १८ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे शो हाऊसफूल होताना दिसत आहेत.
-
दरम्यान, हा चित्रपट यशस्वी ठरल्यानंतर निर्मात्यांनी सक्सेस पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये चित्रपटाशी संबंधित अनेक लोकांनी हजेरी लावली.
-
अभिनेता अजय देवगणने यावेळी काळ्या रंगाचं पुलओव्हर टीशर्ट आणि निळी पॅन्ट घातली होती. या पार्टीशी संबंधित रील अजयने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते.
-
तबूनेही इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. यावेळी या चित्रपटाशी संबंधित महत्त्वाचे लोक एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले.
-
अभिनेत्री श्रिया सरनने यावेळी चित्रपटाच्या निर्मात्यांबरोबर फोटो काढले.
-
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी या पार्टीमध्ये सरप्राइज एंट्री मारली. यासंबंधीची पोस्ट त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे.
-
अनुपम यांनी आपल्या कॅप्शनमध्ये लिहलंय, “यशाच्या शिखरावर पोहोचल्याबद्दल ‘दृश्यम २’च्या संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. मी त्यांच्या या आनंदात सहभागी झालो.”
-
अनुपम पुढे म्हणाले, “मला खूप आनंद झाला. चांगले चित्रपट चालतात. खूप चालतात. जय हो!” (सर्व फोटो : Instagram)

“मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार, महाराष्ट्राचे तुकडे पडणार आणि…”, एकनाथ शिंदेंचं वरळीत वक्तव्य