-
दाक्षिणात्य चित्रपटांनी २०२२ मध्ये बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. बॉलिवूडचे अनेक चित्रपट अयशस्वी ठरले. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ने ३५० कोटी रुपये कमावले.
-
कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना लेखक दिग्दर्शक अभिनेता रिषभ शेट्टीने नव्या कलाकारांना घेऊन हा चित्रपट हिट करून दाखवला.
-
अभिनेते, दिग्दर्शक कमल हासन यांचा ‘विक्रम’ चित्रपटाने ४१० कोटी कमावले, या चित्रपटात तगडी स्टार कास्ट होती.
-
‘बाहुबली’सारखा चित्रपट देणारे दिग्दर्शक राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटाने १११४ कोटी इतके कमावले.
-
दाक्षिणात्य स्टार विजयच्या ‘बिस्ट’ चित्रपटाने २३६. ९० कोटींचा व्यवसाय केला.
-
‘केजीएफ’ चित्रपटाने लोकांना अक्षरशः वेड लावले होते. याच चित्रपटाचा पुढील भाग यावर्षी प्रदर्शित झाला, त्याने ११४८ कोटी कमावले.
-
यावर्षी आलेल्या ‘पीएस १’ या ऐतिहासिक चित्रपटानेदेखील ५०० कोटींचा व्यवसाय केला. हा चित्रपट मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केला होता.
-
किचा सुदीप, जॅकलिन फर्नांडिस अशी स्टार कास्ट असलेल्या ‘विक्रम रोना’ चित्रपटाने २०० कोटी कमावले.
-
अजित या दाक्षिणात्य अभिनेत्याच्या ‘वलीमाई’ चित्रपटाने २२५ कोटी कमावले आहेत.फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

IND vs ENG : स्वत:ची विकेट पाहून अक्षरही अवाक्, गिलने तर डोक्यालाच लावला हात; आदिलच्या जादुई चेंडूचा VIDEO व्हायरल