-
दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानी बॉयफ्रेंड आणि बिझनेस पार्टनर सोहेल खातुरियाबरोबर लग्नबंधनात अडकली आहे.
-
काल म्हणजेच रविवार ४ डिसेंबरला त्यांचा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या लग्नातील कार्यक्रमांचे फोटो वाऱ्याच्या वेगाने इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत.
-
आज आपण अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या मेहंदी कार्यक्रमापासून लग्न सोहळ्यातील खास क्षणांवर नजर मारूया.
-
राजस्थानमध्ये गुरुवारी १ डिसेंबरला मेहंदी कार्यक्रमापासून हंसिकाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. यावेळी हे जोडपे खूपच आनंदी दिसत होते.
-
शुक्रवारी त्यांनी ‘सुफी नाईट’चाही आनंद घेतला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
-
या सुफी नाईटसाठी हंसिकाने परिधान केलेला पोशाख खूपच सुंदर होता. यावेळी ती एखाद्या राजकन्येप्रमाणे भासत होती.
-
शनिवारी दुपारी हंसिका आणि सोहेलने आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांसाठी कॉकटेल पार्टीचे आयोजन केले होते.
-
यावेळी वधू आणि वराने पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तसेच त्या दोघांनी एकत्र डान्सही केला.
-
हा लग्नसोहळा एखाद्या ग्रँड सेलिब्रेशनपेक्षा कमी नव्हता. हंसिकाच्या मित्र-मैत्रिणींनी या सोहळ्याचे एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
हळदीच्या कार्यक्रमात हंसिकाने पिवळ्या फ्लोरल प्रिंटचा पांढरा ड्रेस घातला होता.
-
हंसिका आणि सोहेलने हळदीच्या कार्यक्रमातही सारखेच कपडे परिधान केले होते.
-
लग्नाच्या आदल्या रात्री हंसिका आणि सोहेलचा संगीत कार्यक्रम झाला.
-
यावेळी हंसिकाने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता तर सोहेलने काळ्या रंगाची शेरवानी घातली होती.
-
हंसिका आणि सोहेलचा विवाहसोहळा जयपूरमधील मुंडोटा फोर्ट आणि पॅलेसमध्ये पार पडला.
-
पारंपारिक सिंधी पद्धतीमध्ये त्यांच्या लग्नाच्या विधी पार पडल्या.
-
हंसिकाने लग्नाच्या दिवशी लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. याबरोबर तिने भारी दागिने घातले होते.
-
हंसिकाचा विवाहसोहळा चित्रपटामध्ये दाखवल्या जाणाऱ्या ग्रँड सोहळ्यांसारखाच होता. या लग्नातील फोटो आणि व्हिडीओचा सोशल मीडियावर पूर आला आहे.
-
काही दिवसांपूर्वीच अगदी चित्रपटातल्या सीनप्रमाणे सोहलने रोमँटिक अंदाजात गुडघ्यावर बसून आयफेल टॉवरसमोर हंसिकाला प्रपोज केलं होतं. (सर्व फोटो: Instagram)
“पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ईडी-सीबीआयचा गैरवापर नाही, मी त्यांच्या जागी असतो तर…”- प्रकाश आंबेडकर