-
बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवालने ५ डिसेंबर रोजी तिचा ३० वा वाढदिवस तिच्या मित्र आणि कुटुंबासह साजरा केला. दिव्याने तिच्या वाढदिवशी एक मोठी पार्टी आयोजित केली होती. यामध्ये मनोरंजन जगतातील अनेक कलाकार उपस्थित होते.
-
विशेष म्हणजे आपल्या वाढदिवशी दिव्याने बिझनेसमन अपूर्व पाडगावकरबरोबर साखरपुडा केला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, नऊ महिन्यांपूर्वीच दिव्या आणि वरुण सूदचा ब्रेकअप झाला होता.
-
दिव्या अग्रवालने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपूर्व पाडगावकरबरोबरचे फोटो शेअर करून तिच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. दिव्याच्या ३०व्या वाढदिवशी मराठमोळ्या अपूर्व पाडगावकरने तिला अंगठी घालून प्रपोज केले.
-
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आपण पाहू शकतो, दिव्या तिची अंगठी दाखवत आहे आणि अपूर्वसह रोमँटिक पोज देत आहे. दिव्या पर्पल कलरच्या ड्रेसमध्ये तर अपूर्व काळ्या रंगाच्या शर्टमध्ये आहे. दोघेही एकत्र खूप आनंदी दिसत आहेत.
-
हे फोटो शेअर करत दिव्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मी कधी माझे हसू थांबवू शकेन का? कदाचित नाही. जीवन आणखीनच उजळ झाले आहे आणि मला हा प्रवास करण्यासाठी योग्य सोबती सापडला आहे.’
-
‘त्याची #BaiCo कायमचे वचन. या दिवसापासून मी कधीही एकटी प्रवास करणार नाही.’ दिव्याची ही पोस्ट पाहून चाहते आणि स्टार्स तिचं अभिनंदन करत आहेत.
-
दिव्या अग्रवालचा होणाऱ्या नवऱ्याचे नाव अपूर्व पाडगावकर आहे. तो एक अभियंता आणि उद्योजक आहे. त्याचे स्वतःचे रेस्टॉरंट आहे.
-
दिव्या अग्रवाल यापूर्वी ती वरुण सूदला अनेक वर्षांपासून डेट करत होती. दोघेही बराच काळ सोबत होते आणि त्यांच्या लग्नाच्या बातम्याही येऊ लागल्या होत्या. पण या वर्षी मार्चमध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.
-
दिव्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून वरुण आणि तिच्या ब्रेकअपची माहिती दिली आहे. त्याचवेळी, आता नऊ महिन्यांनंतर दिव्याने अपूर्वशी साखरपुडा केला आहे. (सर्व फोटो: इन्स्टाग्राम)

“तुम्हाला हे शोभत नाही” म्हणत अमृता फडणवीसांना नेटकऱ्यांनी केलेलं ट्रोल; त्याच फोटोंवर जॅकी श्रॉफ कमेंट करत म्हणाले…