-
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’मधील पाचव्या चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली.
-
फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटांनंतर ‘सुभेदार’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
‘सुभेदार’ या चित्रपटाद्वारे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा रुपेरी पडद्यावर दाखवण्यात येणार आहे.
-
नुकतंच या चित्रपटाच्या संहिता पूजनाचा कार्यक्रम तानाजी मालुसरे यांचं मूळ गाव गोडवली (वाई) येथे पार पडला.
-
अभिनेता समीर धर्माधिकारी शेलार मामा यांच्या भूमिकेमध्ये तर अभिनेते अजय पुरकर तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार असल्याचं समोर आलं.
-
दिग्पाल लांजेकर यांच्यासह चित्रपटातील कलाकार मंडळींनी तानाजी मालुसरे यांची समाधी असलेल्या उमरठ गावाला भेट दिली.
-
यावेळी नरवीर तानाजी मालुसरे संस्था महाराष्ट्र राज्य कमिटीमधील मान्यवर मंडळी उपस्थित होती. ‘सुभेदार’ चित्रपटाच्या संहितेचं पूजन करून तान्हाजी आणि शेलारमामा यांच्या चरणी संहिता अर्पण करण्यात आली.
-
अभिनेत्री स्मिता शेवाळे तानाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.
-
‘सुभेदार’ चित्रपट पुढील वर्षी जून महिन्यात प्रदर्शित होईल.फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम मीडिया वन

Women U19 WC: भारताच्या लेकी बनल्या करोडपती! पहिल्यावहिल्या विश्वचषकावर नाव कोरताच BCCI सचिव जय शाहांची मोठी घोषणा