-
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा काल, ८ डिसेंबरला वाढदिवस होता. यावेळी धर्मेंद्र यांनी आपला ८७ वा वाढदिवस साजरा केला. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये झाला होता.
-
त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक बॉलीवूड स्टार्स आणि चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, धर्मेंद्र यांची पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही त्यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
-
हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्याबरोबरच त्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि खास संदेश लिहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
हेमा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचे आणि धर्मेंद्र यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. तसेच, दोघांनी मॅचिंग कपडे घातले आहेत.
-
एकीकडे धर्मेंद्र यांनी गुलाबी रंगाचा शर्ट परिधान केला आहे, तर हेमा मालिनीही गुलाबी रंगाच्या साडीत खूपच सुंदर दिसत आहेत.
-
हेमा मालिनी यांनी या फोटोसह एक सुंदर संदेशही लिहिला आहे. त्यांनी लिहिले, ‘आज माझ्या प्रिय धरमजींच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते.’
-
‘त्यांचे आयुष्य सदैव आनंदाने भरलेले राहो हीच प्रार्थना. आज आणि त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी माझ्या प्रार्थना त्यांच्याबरोबर असतील. माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.’
-
धर्मेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा मोठा नातू करण देओल आणि मुलगा बॉबी देओल यांनीही एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये धर्मेंद्र बॉबी देओल आणि करणबरोबर पूजा करताना दिसत आहेत. या फोटोसोबत बॉबीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमचा मुलगा आणि नातू म्हणून आम्ही खूप भाग्यवान आहोत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बडे पापा.’
-
अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांची मुलगी इशा देओलनेही त्यांच्यासाठी अतिशय भावूक संदेश लिहून त्यांच्याबरोबरच फोटो पोस्ट केला आहे. तिने लिहिले, ‘तुमच्यामुळे आम्ही आहोत… तुम्ही आमचा एक मजबूत आधारस्तंभ आहात… आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो.’ (Photos: Imstagram)
“मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार, महाराष्ट्राचे तुकडे पडणार आणि…”, एकनाथ शिंदेंचं वरळीत वक्तव्य