-
२०२२ या वर्षात मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. नुकतंच अक्षय देवधर आणि हार्दिक जोशी यांच्या बरोबरच दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवाणीने आपला प्रियकर सोहेलसह लग्नगाठ बांधली.
-
नुकतंच हंसिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. तिने आपल्या सासरी पहिल्यांदाच एक गोड पदार्थ बनवला आहे. याचा फोटो अपलोड केला आहे.
-
याच पार्श्वभूमीवर अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी आपल्या सासरी पहिल्यांदाच कोणता पदार्थ बनवून आपल्या सासरच्या मंडळींना प्रभावित केले होते, हे आपण जाणून घेऊया.
-
या यादीमध्ये पाहिलं नाव आहे ते म्हणजे अभिनेत्री कतरीना कैफ हिचं. गेल्या वर्षी अभिनेता विकी कौशल आणि कतरिनाने लग्नगाठ बांधली. यानंतर कतरिनाने पहिल्यांदाच ‘हलवा’ बनवला होता.
-
याचा फोटो आपल्या स्टोरीवर पोस्ट करून तिने लिहले, “हलवा मी बनवला आहे.” विकीनेही आपल्या स्टोरीवर करीनाने बनवलेल्या हलव्याचा फोटो पोस्ट करत तिचे कौतुक केले होते.
-
अभिनेत्री करिश्मा तन्नाने ५ फेब्रुवारीला प्रियकर वरुण बंगेरासोबत लग्न केले. लग्नानंतर तिनेही पहिल्यादा शिरा बनवला होता.
-
यावेळी एक व्हिडीओ शेअर करत करिश्माने लिहिले की, ‘लग्नानंतरचा पहिलाच पदार्थ… काहीतरी गोड खाऊया.’
-
‘कुंडली भाग्य’ फेम अभिनेत्री श्रद्धा आर्यही काही काळापूर्वी विवाहबंधनात अडकली. श्रद्धाने लग्नानंतर पहिल्यांदाच हलवा बनवला होता.
-
हलवा बनवतानाच व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. तिने ड्रायफ्रुट्सने हा हलवा सजवला होता.
-
अभिनेत्री निती टेलरने १३ ऑगस्ट २०२२ला परीक्षित बावासोबत लग्न केले. अभिनेत्रीने तिच्या पहिल्या स्वयंपाकघरात गव्हाच्या पिठाचा हलवा बनवला होता. त्याचा फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला होता.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानीने अलीकडेच तिच्या सासरी हलवा बनवला. याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आला आहे. हंसिकाच्या पतीने तिचा हा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
-
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने या वर्षी २४ एप्रिल रोजी रणबीर कपूरसोबत लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, आलियाने आपल्या सासरी पहिल्यांदाच पुडिंग बनवले होते. याशिवाय तिने एकदा रणबीर कपूरसाठी अननसाचा केकदेखील बनवला होता. (Photos: Instagram)

“कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार लढणार”, नाना पटोलेंच्या विधानावर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया; म्हणाले, “जागा दोनच…”