-
वर्ष २०२२ संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, या वर्षात मनोरंजन विश्वात अनेक घडामोडी घडल्या. या घटनांनी चाहत्यांना काही सुखद तर काही आश्चर्यकारक धक्के दिले.
-
अनेक जोडप्यांची लव्हस्टोरी या वर्षात चर्चेचा विषय ठरली. आज आपण अशाच काही जोडप्यांविषयी जाणून घेऊया.
-
या वर्षात अभिनेत्री सुश्मिता सेन आणि ललित मोदी, त्याचप्रमाणे अभिनेत्री सारा आली खान आणि क्रिकेटपटू शुभमन गिल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले होते. अशाच काही जोड्या यावर्षात अनेक कारणांमुळे चर्चेत राहिल्या.
-
अभिनेत्री सुश्मिता सेन आणि आयपीएलचे संस्थापक ललित मोदी हे आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत राहिले.
-
ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुश्मिताबरोबरचे फोटो पोस्ट करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
-
दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांनी आदिपुरुष या चित्रपटात एकत्र काम केले. यानंतर हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या. इतकेच नाही तर पुढच्या वर्षी दोघेही लग्न करू शकतात अशा बातम्याही येत आहेत. तथापि, प्रभासने या सर्व अफवा असल्याचे म्हटले आहे.
-
या वर्षी अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याचे नाव महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीबरोबर जोडण्यात आले. या दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या.
-
इब्राहीम अली खान आणि पलक तिवारी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा या वर्षी रंगल्या. तथापि, या दोघांनीही आपल्या नात्याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही. मात्र, अनेक ठिकाणी या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले होते.
-
यावर्षी सारा अली खान आणि क्रिकेटपटू शुभमन गिल यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी सर्वांचेच लक्ष वेधले. अनेक मीडिया रिपोर्ट्सनीही या दोघांचे अफेअर सुरू असल्याचा दावा केला होता. (Photos: Instagram/twitter)

लग्नाबद्दल बोलत होता रितेश देशमुख; मागून बायको आली अन्…, पाहा नेमकं काय घडलं