-
१९८९ मध्ये सलमान खान आणि भाग्यश्री स्टारर ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील जोडीचे कौतुक झाले.
-
या चित्रपटानंतर भाग्यश्री मात्र चित्रपटसृष्टीपासून लांब राहिली मात्र आता तिची मुलगी बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणार आहे.
-
भाग्यश्रीला दोन मुले आहेत, मुलाचे नाव अभिमन्यू आणि मुलीचे नाव अवंतिका असून तिने मिथ्या या वेबसीरिजमधून पदार्पण केले आहे.
-
अवंतिकादेखील आईसारखी सुंदर दिसायला आहे. अवंतिका सोशल मीडियावरदेखील सक्रीय असते.
-
अवंतिकाचा जन्म मुंबईचा असून तिने लंडनमधून आपले बिझनेस मार्केटिंग विषयात पदवी संपादन केली आहे.
-
नुकतेच तिने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर भाष्य केलं आहे, आई भाग्यश्री याच क्षेत्रातील असल्याने तिला त्याचा फटका बसला आहे.
-
ती मुलाखतीत म्हणाली की, “भाग्यश्रीची मुलगी असण्याचा मला तोटा झाला आहे,” मला सुरवातीला काम मिळत नव्हते.
-
अवंतिकाने काही काळ नोकरीदेखील केली आहे मात्र त्याचा तिला कंटाळा आला होता.
-
अवंतिकाने पदार्पणातच हुमा कुरेशी, परमब्रत चॅटर्जी, रजित कपूर आणि समीर सोनी या अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. लवकरच ती ‘नेनू स्टुडंट सर’ या तमिळ चित्रपटात दिसणार आहे.फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

शनिदेव सोन्याच्या पायांनी मार्गी होताच ‘या’ राशी होणार श्रीमंत? वर्षभर होऊ शकतो प्रचंड धनलाभ