-
बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आहे.
-
बॉलिवूडमधील सर्वाधिक महागड्या कलाकारांपैकी एक म्हणून सलमान खानला ओळखले जाते.
-
बॉलिवूडचा सुपरस्टार आणि ‘दबंग’ अभिनेता सलमान खान आज २७ डिसेंबरला त्याचा ५७वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
सलमान खान यंदा त्याच्या बहिणीच्या घरी ५७वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
सलमान खानचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत.
-
टायगर जिंदा है, बजरंगी भाईजान आणि सुलतान या त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
-
कोणतीही भूमिका असो सलमान त्याला पूर्णपणे न्याय देतो.
-
सलमानने १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
सलमानला ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली.
-
५७ वर्षाचा होऊनही आजही सलमानच्या फिटनेसपुढे कित्येक स्टार्स फिके पडतात.
-
सलमान खानचा फिटनेस पाहून तो किती वर्कआउट्स (Workout) करत असेल याचा अंदाज बांधता येतो.
-
सलमान त्याच्या फिटनेसकडे खूप बारकाईने लक्ष देतो. आज आपण त्याच्या या फिटनेसमागचं रहस्य जाणून घेणार आहोत.
-
सलमान खान हाय व्हॉल्यूम ट्रेनिंग (High volume training) घेतो.
-
सलमानच्या मते हाय व्हॉल्यूम ट्रेनिंगनंतर शरीराला विश्रांती देणे देखील आवश्यक आहे.
-
सलमान खान अनेक स्टार्सचा फिटनेस आयडॉल आहे.
-
सलमान खान त्याच्या फिटनेस आणि आरोग्याची विशेष काळजी घेतो.
-
सलमान खान ब्रेकफास्टमध्ये अंडी आणि लो फॅट दूध घेतो. तो अंड्याचा पांढरा भाग खातो. (Photo-pexels)
-
सलमान खान आपल्या आहाराची विशेष काळजी घेतो. तो दुपारच्या जेवणात चपाती, ग्रील्ड भाज्या आणि सलाद खातो.
-
सलमान खान संध्याकाळी बदाम खातो. तो खूप फूडी आहे. त्याला इटालियन पदार्थ खायला आवडतात.
-
सलमान खान रात्री हलका पदार्थ खातो. तो रात्री फक्त २ अंडी, मासे किंवा चिकन सूप खातो.
-
सलमान खान आपल्या फिटनेसची काळजी घेण्यासाठी मिठाई खात नाही. तो गोड आणि तेलकट पदार्थांचे सेवन टाळतो. (फोटो सौजन्य-संग्रहित छायाचित्र)

“…भाजपात आलोय, ही माझी अडचण”; फडणवीसांच्या उपस्थितीत भरसभेत नारायण राणेंचं विधान!