-
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याने २७ डिसेंबरला ५७ वा वाढदिवस साजरा केला. यावेळी एक मोठ्या पार्टीचेही आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
-
सलमान खान हा असा अभिनेता आहे जो आपल्या चित्रपटांमधून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या प्रयत्नात असतो. आजवर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना सलमानने आपल्या चित्रपटातून लॉन्च केले आहे.
-
आज आपण अशा काही कलाकारांविषयी जाणून घेऊया, ज्यांनी अभिनेता सलमान खानच्या चित्रपटांमधून या सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
-
सलमान खानने अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर हिला ‘दबंग 3’ मधून बॉलिवूडमध्ये लॉन्च केले.
-
सलमानने त्याचा सहकलाकार मोहनीश बहल याची बहीण प्रनूतन बहल हिला ‘नोटबुक’ या चित्रपटामध्ये कास्ट केले आणि तिला बॉलिवूडमध्ये संधी दिली.
-
ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षीलाही सलमानने लॉन्च केले होते. सोनाक्षीने सलमानसोबत ‘दबंग’ या चित्रपटात काम केले.
-
आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पंचोलीला सलमान खानने त्याच्या ‘हिरो’ या चित्रपटातून लॉन्च केले होते.
-
अभिनेता झहीर इक्बालचे वडील इक्बाल रत्नासी हे सलमानचे खूप चांगले मित्र आहेत. सलमानने झहीरला ‘नोटबुक’ या चित्रपटात संधी दिली.
-
सुनील शेट्टीची मुलगी अथियाला सलमानने त्याच्या ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते.
-
सुनील शेट्टीचा मुलगा अहानला तडपमध्ये भूमिका मिळवून देण्याचे श्रेयसुद्धा सलमान खानलाच जाते.
-
बहीण अर्पिता खानचा पती, अभिनेता आयुष शर्मालाही सलमानने ‘लवयात्री’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते.
-
(सर्व फोटो : Instagram)

Turkey Earthquake Video : टर्कीमध्ये २४ तासांत तिसरा भूकंप, मृतांचा आकडा १५०० च्या वर